व्हॉलीबॉल नीट टाक म्हणत मारहाण
लातूर - जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे व्हॉलीबॉल नीट टाक म्हणत लाथा-बुक्यांनी मारहाण करून एकाचे दगडाने डोके फोडून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत बालाजी गणेश केंद्रे (रा. माळहिप्परगा, ता. जळकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश हरी केंद्रे व अन्य दोघांविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
---------------------------
बनशेळकी शिवारातून दुचाकीची चोरी
लातूर - उदगीर तालुक्यातील बनशेळकी शिवारातून (एमएच २४ बीएफ ४०२३) या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत लखन हणमंतराव उपाध्याय (व्यवसाय शेती, रा. नोबल कॉलनी, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-------------------------------
प्लॉटच्या कारणावरून काठीने मारहाण
लातूर - संगणमत करून सामायिक प्लॉटमध्ये झालेल्या खोदकामाच्या कारणावरून फिर्यादीला काठीने मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना हंडरगुळी येथे घडली. याबाबत संभाजी त्र्यंबक काळवणे (रा. हंडरगुळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद उमाकांत काळवणे यांच्यासह अन्य एकाविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. बळदे करीत आहेत.
------------
दारू पिवून भांडणाची कुरापत, बक्कल मारून केले जखमी
लातूर : तू आठवी वर्गात असताना माझ्यासोबत भांडण केले होतेस म्हणून आरोपींनी संगनमत करून दारू पिऊन मारहाण केल्याची घटना मित्रनगर येथे घडली. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सुशील बजरंग साबळे यास दारू पिऊन येऊन विनाकारण मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. तू आठवी वर्गात असताना माझ्यासोबत भांडण केले होतेस म्हणून बेल्टच्या बक्कल मारले व धमकी दिली, असे सुशील साबळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गणेश जाधव व ऋषिकेश कोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कनामे करीत आहेत.