शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्गांसाठी आठ बाय आठची एकच खोली! आर्वी गायरानातील मनपाची शाळा की 'कोंडवाडा'

By हणमंत गायकवाड | Updated: January 15, 2024 16:26 IST

वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

 

लातूर : शहरातील क्वाईल नगर झोपडपट्टीतून आर्वी गायरानामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या मुलांसाठी मनपाच्या वतीने शाळा क्रमांक १० चालविली जाते. मात्र, या शाळेला ना इमारत, ना वर्गखोल्या, ना स्वच्छतागृह, ना किचन शेड. आठ बाय आठच्या एका खोलीत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग चालविले जात असून, दाटीवाटीने बसवून ५३ मुलांना शिकविण्याची कसरत या शाळेतील दोन शिक्षकांना क1रावी लागत आहे.

वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. लातूर शहरातून झोपडपट्टीतील नागरिक आर्वी गायरानांमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर पुनर्वसनात घरे बांधून देण्यात आली. त्यातील एका घरामध्ये मनपाची शाळा क्रमांक १० चालविली जात आहेः परंतु या वर्गखोलीची अवस्था बिकट झालेली आहे.

उंदीर-घुशीने पोखरले...उंदीर आणी घुशीने विटा-मातीचे बांधकाम पोखरून टाकले आहे. धोकादायक अवस्थेमध्ये मुलांची शाळा तिथे भरवली जाते.आठ बाय आठच्या खोलीमध्ये पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसवले जातात आणि सहा बाय आठच्या खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवलेले आहे.

या आहेत मागण्या... वर्गखोल्या बांधून द्याव्यातकार्यालय व किचनसाठी स्वतंत्र खोली असावी.विद्यार्थ्यांसाठी डेस्क असावेत. शिकविण्यासाठी बोर्ड हवेत.शाळेला कम्पाऊंड वॉल, मजबूत गेट असावे.मुला-मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट असावे.किमान चार वर्गखोल्या असाव्यात.आदी मागण्यांचे निवेदन मनपा प्रशासनाला मुख्याध्यापकांनी वारंवार दिलेल्या आहेत.

मुख्याध्यापक म्हणाले...शाळेसाठी दोन वर्गखोल्या आहेत. त्यापैकी एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य आणि दुसरे वर्ग भरविले जाते. एक खोली ६ बाय ८ ची असून, दुसरी खोली ८ बाय ८ ची आहे. दोन्ही खोल्या नादुरुस्त आहेत. धोकादायक आहेत. एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य तर दुसऱ्या खोलीत वर्ग भरविले जातात.  खोल्या मोडकळीस आल्याने वर्ग भरविण्याची भीती वाटते, असे मुख्याध्यापक अमोल इंद्राळे म्हणाले.

मुख्याध्यापकांचा पाठपुरावा...मुख्याध्यापकांनी आयुक्त, उपायुक्त व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदने पाठवून वर्गखोली बांधून देण्याची मागणी केली. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष आहे. शाळेचे मुख्याध्यापक अमोल इंद्राळे यांनी १३ जून २०२२, २७ जानेवारी २०२२ आणि २१ मार्च २०२२ रोजी पत्र पाठवून वर्गखोली बांधकामाची तसेच शाळेची इमारत धोकादायक असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. मात्र, त्यांच्या या मागणीची दखल आजपर्यंत घेतलेली नाही.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्र