शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा तालुक्यातील हासोरीत भूकंपाचे धक्के? भयभीत ग्रामस्थ रस्त्यावर

By आशपाक पठाण | Updated: September 6, 2022 23:35 IST

रात्री १०.१२ मिनिटाला मोठा आवाज.

निलंगा (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हासोरी (बु.) गावात मंगळवारी रात्री १०.१२ वाजण्याच्या भूगर्भातून अचानक जोराचा आवाज झाल्याने लोक भूकंपाच्या भितीने काही क्षणातच रस्त्यावर आले. जमीन हादरत असल्याचे लक्षात येताच सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ झाली. 

हासोरी बु. गावात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अनेकजण झोपेची तयारी करीत होते. भुगर्भातून अचानक जोरदार हादरे सुरू झाले. काहीतरी जमिनीखालून जात असल्याचा भास होत असल्याने अनेकांनी आरडाओरड सुरू केली. काही तात्काळ पटांगणात धावत सुटले. हा धक्का झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पशूधनही सुरक्षितस्थळी हलविले.

सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सौम्य धक्का जाणवला असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. यासंदर्भात गावातील ज्ञानेश्वर बरमदे म्हणाले, जोरदार आवाज झाल्याने सर्वजण घराबाहेर धावत सुटले. ३० सप्टेंबर १९९३ च्या किल्लारी भूकंपाची आठवण ज्येष्ठ नागिरकांनी कुटुंबियांना करून दिली. यासंदर्भात निलंग्याचे नायब तहसीलदार घनश्याम आडसुळ यांना माहिती दिली. निलंग्याचे नायब तहसीलदार घनश्याम आडसुळ म्हणाले, आवाज नेमका कशाचा होता याबाबतची माहिती घेतली जात आहे. त्यापद्धतीने प्रशासन हासोरी बु. गावात चौकशी करणार आहे. हासोरी बु. गावात भूगर्भातून आवाज झाला आहे. नेमका भूकंप आहे का याची माहिती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिली.

टॅग्स :Earthquakeभूकंप