शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये अनधिकृत वाळू उपशावर महसूलची पहाटे कारवाई; ११ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:21 IST

कोळपा शिवारात महसूलच्या पथकाने पहाटे ५.३० ते सकाळी ११ यावेळेत मोहिम राबवून जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत.

ठळक मुद्देएकाचवेळी चार पथकांनी राबविली मोहिम

लातूर : तालुक्यातील कोळपा शिवारातील एका साठवण तलावातून अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार स्वप्नील पवार यांनी सापळा रचून चार पथकांची नियुक्ती केली. मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तलावाकडे जाणारी चारही रस्ते ब्लॉक करून एकाचवेळी तब्बल ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोळपा शिवारात सोनवतीनजीक असलेल्या साठवण तलावात माती बाजूला सारून त्याखाली निघत असलेल्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने स्वतः तहसीलदार स्वप्नील पवार यांनी पुढाकार घेत चार पथक तयार केले. सदरील पथकाने मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोळपा शिवार गाठले. तलावाकडे जाणारे चारही रस्ते अडविण्यात आले. यावेळी तलावातून अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ टिप्पर व ६ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून सदरील वाहने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत. त्यांच्याकडून जवळपास १३ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. याबाबत दंडाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली. 

तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार राजेश जाधव, श्रावण उले, भिमाशंकर बेरूळे यांची वेगवेगळी चार पथके होती. त्यांच्यासोबत जवळपास २३ कर्मचारी सहभागी होती. त्यात मंडळ अधिकारी त्रिंबक चव्हाण, तलाठी चंद्रशेखर फड, संदेश राठोड, प्रनित बोघणे, गजानन मुळे, मनोज मलवाड, डी.एस. हिप्परकर, विठ्ठल काळे, राहुल माळवदकर, सुनिल लाडके, विलास कलाकुसर, रणजित पानगावकर, महेश हिप्परगे, सचिन तावशीकर, चालक गोविंद शिनगिरे आदींचा समावेश होता.

पहाटे ५.३० ते ११ पर्यंत मोहिम...कोळपा शिवारात महसूलच्या पथकाने पहाटे ५.३० ते सकाळी ११ यावेळेत मोहिम राबवून जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दंड म्हणून जवळपास १३ लाख रूपये वसूल करण्यात येतील, असे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी सांगितले. वाळूची वाहने पळून जाऊ नयेत, यासाठी चारही रस्त्याने पथक उभे करण्यात आल्याने एकाचवेळी ११ वाहने पकडण्यात आली आहेत.

टॅग्स :sandवाळूlaturलातूरRevenue Departmentमहसूल विभाग