शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीची धास्ती; प्रशासकीय इमारतीत साफसफाई!

By हरी मोकाशे | Updated: October 6, 2023 17:36 IST

कचरा, दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास

लातूर : जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारतीत कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत होती, त्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास होत होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाहणीसाठी येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने शुक्रवारी इमारतीतील एका विभागाने आपले साहित्य उचलत स्वच्छता मोहीम राबविली.

प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये आहेत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने नागरिकांची रेलचेल असते. तीन मजली कार्यालयात अनावश्यक साहित्य पडल्याचे दिसून येते. शिवाय, काही ठिकाणी कचरा पडल्याने आणि स्वच्छतागृहाची नियमितपणे साफसफाई करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर जिल्हा सांख्यिकी कार्यालय असून काही महिन्यांपूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे जुने फर्निचर इमारतीत बाजूस टाकण्यात आले होते.दरम्यान, जिल्हाधिकारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयास भेटी देणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने सदरील कार्यालयाने सफाईची मोहीम हाती घेतली. तासाभरात मजुरांकडून स्वच्छता करून घेतली.

इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्या...सदर विभागाने जुने फर्निचर काढल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे आढळून आले. शिवाय, दारूच्या रिकाम्या बाटल्याही पहावयास मिळाल्या. त्यामुळे काही कामानिमित्ताने ये-जा करीत नागरिक आचंबित होऊन पाहत होते. काही नागरिक तर शासकीय कार्यालयाच्या इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्या कशा काय असा सवाल उपस्थित करीत होते.

कर्मचारी- मजुरांत वादावादी...जुने लाकडी साहित्य उचलण्यासाठी सदरील कार्यालयातील कर्मचाऱ्याने तीन- चार मजुरांना बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे मजूर काही वेळात काम पूर्ण करती होते. तेव्हा तेथील कर्मचारी आणखीन काम सांगत असल्याने वादवादी सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. हे पाहून उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. 

टॅग्स :laturलातूरcollectorजिल्हाधिकारी