शहरातील स्वामी विवेकानंद चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमात उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी नगराध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे यांच्या हस्ते डॉ. संतुजी लाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन बंडापल्ले, सुनीत खंडागळे, ॲड.राजेश खटके, ॲड. राजेश खटके, ॲड. प्रदिपसिंह गंगणे, संतुजी ब्रिगेडचे ॲड. अमितकुमार कोथमिरे, दिगंबर कांबळे, ताहेरभाई सौदागर, ॲड. देविदास बोरूळे, परिवर्तन ग्रुपचे कमलाकर कांबळे, बालाजीआप्पा पिंपळे, ॲड.सुहास बेद्रे, डॉ.रमेश बांगडे, मनीषा कोकणे, पूजा निचळे, ॲड.रोहीत सोमवंशी, ॲड. किशोर सूर्यवंशी, ॲड. आनंद सोनवणे, दीपक गंगणे, प्रा. विश्वनाथ आलटे, साईनाथ घोणे, अखिल भारतीय खाटीक समाज जिल्हाध्यक्ष रोहीत थोरात, किरण कांबळे,श्रीकांत गंगणे,अजय घोणे, योगेश डोंगरे, ज्ञानोबा वंजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष जमालोद्दीन मणियार, स्वागताध्यक्ष ॲड. सुनित खंडागळे आदींनी परिश्रम घेतले आहे. सूत्रसंचालन दीपक गंगणे यांनी केले. रविकुमार वंजारे यांनी आभार मानले.
डॉ. संतुजी लाड यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST