शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

लातूर : काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक ...

लातूर : काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक घडविणाऱ्या महाविद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ४० कॉलेजमध्ये १५०० जागांसाठी केवळ ९०० अर्ज आले आहेत. त्यामुळे डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा सीईटी देणे अनिवार्य असते. दरम्यान, सीईटी देऊनही नोकरीसाठी वेटिंगच करावी लागत असल्याने डीएडला प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाली आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने काही डीएड कॉलेज बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

नोकरीची हमी नाही...

डीएड केल्यानंतर नोकरीसाठी पैशांची मागणी होती. अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

भरती बंद असल्याने अनेक जणांना शाळेवर कंत्राटी तत्त्वावर काम करावे लागते. अल्प मानधन मिळते.

सद्य:स्थितीत भरती नाही, नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.

म्हणून इतर अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश...

मोठ्या भावाने चार वर्षांपूर्वी डीएड केले. त्याला अद्यापही नोकरी मिळालेली नाही. आठ वर्षांपासून शिक्षक भरतीही झालेली नाही. नोकरीची हमी नसल्याने भावासारखी माझी स्थिती होऊ नये म्हणून, डीएडला प्रवेश न घेता बीएससीला प्रवेश घेतला आहे. - तुकाराम गंपले

गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. शासनाकडून तारीख पे तारीख सुरू आहे. त्यातच कित्येक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा जास्त असल्याने डीएडऐवजी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. इंजिनिअर झाल्यावर कोणत्याही कंपनीत नोकरी लागू शकते. - सूरज गिरी

प्राचार्य म्हणतात...

२०१४-१५ या वर्षामध्ये सीईटी झाली होती. त्याद्वारे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली. सद्य:स्थितीत शिक्षकभरती बंद आहे. नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थी प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नियमित शिक्षकांची पदे भरावेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा डीएडकडे कल वाढेल. - प्रवीण मोहिते

उदासीन धोरणांमुळे अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. टीईटीचेसुद्धा वेळेवर नियोजन नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे.

बारावीचा निकाल लागताच डीएडची प्रवेशप्रक्रिया सुरू होते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत अर्ज भरण्याची तारीखही संपते. परिणामी, इच्छा असूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. - गणपत माने