अप डाऊनलाेड करताच बँक खाते साफ...
१ एखादे अप डाऊनलाेड करताच आले बँक खाते काही क्षणात साफ हाेते. हा अनुभव फसवणूक झालेल्या व नागरिकांना आला आहे. अशा पद्धतीने माेठ्या प्रमाणावर गंडविल्याचा प्रकार समाेर आला आहे.
२ अनाेळखी संकेतस्थळाबाबत, अपबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवा, त्यानंतरच व्यवहार करावा.
३ अनाेळखी लिंक्स आणि संकेतस्थळावर जाण्याचे प्रामुख्याने टाळावे. यातून फसवणूक हाेणार नाही.
या आमिषांपासून सावधानता बाळगा...
१ साेशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालणारे माेठे रॅकेट सक्रिय असल्याचे समाेर आले आहे.
२ निनावी माेबाइल क्रमांकावरून फाेन करून, तुम्हाला लाॅरी लागली आहे, असे सांगून फसविले जाते.
३ घरबसल्या मिळवा लाखाे रुपये, अशी जाहिरातबाजी करत फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
काळजी घ्यावी...
नागरिकांनी व्यवहार कराता, अनाेळखी अप डाऊनलाेड करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. फेक मेसेजपासून सावध राहिले पाहिजे. पूर्ण खातरजमा करूनच व्यवहार करावा, संशय आल्याच पाेलिसांशी संपर्क साधावा.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर
यांच्याप्रमाणेच तुम्हीही फसू शकता...
प्रकरण - १
तातडीने अल्प व्याजदारात कर्ज मिळवा म्हणून मेसेज आला. याबाबत चाैकशी करावी म्हणून फाेन केला. त्यावेळी तातडीने २४ तासात कर्ज मंजूर करण्याची हमी देण्यात आली. यासाठी प्राेसेसिंग फी म्हणून पहिल्यांदा १५ हजार जमा करण्यास सांगितले. त्यानंतर १५ हजार आणि पुन्हा पैशाची मागणी केली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे समजले.
प्रकरण - २
घरबसल्या महिना कमवा ५० हजार रुपये...असा मेसेज आला. यावेळी मी उत्सुकतेपाेटी सदरची लिंग ओपन केली. शिवाय, समाेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत अप-डाऊनलाेडही केला. काही क्षणात माझ्या बँक खात्यावरील रक्कमच गायब झाली. पाेलिसात तक्रार दिली आहे, आराेपीचा शाेध लागला नाही.
ही घ्या काळजी...
१ निनावी माेबाइल फाेनला कुठलाही प्रतिसाद देऊ नका.
२ अनाेळखी अप, लिंक ओपन करू नका, कनेक्ट हाेऊ नका.
३ प्रारंभी खातरजमा करा, संशय आला तर पाेलिसांना कळवा.