शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

धुराच्या लोटामुळे गुदमरतोय डॉक्टरांसह रुग्णांचा श्वास; कचरा जळतोय पण...

By आशपाक पठाण | Updated: May 25, 2024 19:01 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात दुर्गंधी.

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात कचरा जाळण्याचा प्रकार वारंवार होत आहे. परिणामी, रुग्णांसह इतरांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त कचरा आणि त्यात धुराचे लोट पसरत असल्याने या भागातील नागरिकही वैतागले आहेत. मनपा प्रशासनाने उभारलेला कचरा डेपो रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे. शनिवारी दिवसभर कचऱ्याच्या धुराचे लोट सुरूच होते. लातूर शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच भेडसावत आहे. महापालिकेकडून वेळेत कचरा उचलला जात नसल्याने अनेकजण रिकाम्या जागेत कचरा आणून टाकतात. काही ठिकाणी ढीग झाला की त्याला जाळून टाकले जाते, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालगत रेल्वेच्या रिकाम्या जागेत मनपाने जणू कचरा डेपोच केला आहे. याठिकाणी टाकलेला कचरा वेळेत उचलला जात नाही, या भागातील अनेक हॉटेलसह विविध आस्थापनांचा कचरा रिकाम्या जागेत आणून टाकला जातो. दुर्गंधी वाढली की तो पेटवून दिला जातो. मागील काही महिन्यांपासून कचरा जाळल्याने येणाऱ्या धुराच्या लोटामुळे रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, रुग्ण त्यांचे नातेवाईकही त्रस्त झाले आहेत. महापालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी होणारी घुसमट थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दहा दिवसांत दुसऱ्यांदा आगरेल्वेच्या जागेत असलेल्या कचरा डेपोला मागील दहा दिवसांत दुसऱ्यांदा आग लागली आहे. एकदा आग लागली की दोन दिवस धुराचे लोट अन् दुर्गंधीही वाढते. १४ मे रोजी सायंकाळी आग लागली होती. रात्री उशिरा मनपाकडून आग विझविण्यात आली. मात्र, वारंवार कचरा जळत असताना त्यावर उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून धुरामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात आणून दिले. मात्र, पत्र देऊन दहा दिवस लोटले तरी त्यावर कसलीही कारवाई झाली नाही.

वसतिगृहाच्या पाठभिंतीला कचरा डेपो वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या वसतिगृहाच्या पाठभिंतीला कचरा डेपो उभारण्यात आला आहे. याठिकाणी विविध भागांतून आणलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून मुख्य कचरा डेपोकडे नेला जातो. त्यामुळे या भागात मोकाट श्वान, वराहांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कचरा पेटला की धुराचे लोट पसरतात. यात नागरिकांचा श्वास कोंडत आहे. एकदा आग लागली की जवळपास २४ तासांपेक्षा अधिक वेळ कचरा धुमसत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूर