लातूर : जमियते-उलेमा-ए-हिंद या राष्ट्रीय संस्थेची लातूर कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा अध्यक्ष हबीबुर्रहेमान कासमी व मराठवाडा सचिव शमशुल हक कासमी कुरेशी, सोलापूर जिल्हाध्यक्ष मौलाना इब्राहिम कासमी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली़.
यावेळी लातूर जिल्हाध्यक्षपदी मौलाना अब्दुल जब्बार मजाहिरी यांची निवड करण्यात आली़. कार्यकारी अध्यक्षपदी मौलाना अजिमुद्दीन, उपाध्यक्षपदी खाजा चौधरी कलीम अहमदपूर, जनलर सेक्रेटरीपदी मौलाना मुफ्ती सैयद ओवेस कासमी, सचिव मौलाना मुईजोद्दीन कासमी, मुस्तफा झारेकर (निलंगा), कोषाध्यक्षपदी मुफ्ती याकूब यांची निवड करण्यात आली़. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़.
लातूर शहराध्यक्षपदी मुफ्ती सोहेल कासमी, उपाध्यक्षपदी मौलाना अजहर कासमी घावटी, असलम मोमीन, सचिवपदी मौलाना जावेद खान कासमी, मुफ्ती अब्दुल्लाह कासमी, इस्लाम उल हक, कोषाध्यक्षपदी मौलाना जकरिया मजाहिरी यांची निवड करण्यात आली़. या कार्यक्रमाला शहर व जिल्ह्यातील उलेमांची उपस्थिती होती़.