शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरून घेण्यात जिल्हा बँक अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

लातूर : जिल्हा बँक पीक विमा भरून घेण्यात राज्यात अव्वलस्थानी असून, बँकेच्या १११ शाखांमध्ये २ लाख ६१ हजार १६८ ...

लातूर : जिल्हा बँक पीक विमा भरून घेण्यात राज्यात अव्वलस्थानी असून, बँकेच्या १११ शाखांमध्ये २ लाख ६१ हजार १६८ शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकेने गावस्तरावर सोसायटी, कार्यालयात पीक विमा भरून घेण्याची सोय केली होती. कोविडच्या काळात सलग दुसऱ्यावर्षी बँकेने गावातून पीक विमा भरून राज्यात नवा पॅटर्न निर्माण केला आहे. सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गावातून पीक विमा स्वीकारला असून, बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, कार्यकारी संचालक हणमंत जाधव व संचालक मंडळाच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

तालुकानिहाय पीक विमा अन्‌ शेतकरी सभासद

लातूर तालुक्यात ३४ हजार २९ शेतकऱ्यांनी ३ कोटी २९ लाख ९२ हजार रुपयांचा पीक विमा भरला आहे. रेणापूर तालुक्यात १४ हजार ७४६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३० लाख ८ हजार रुपये, औसा तालुक्यात ४४ हजार ३४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ६६ लाख ८९ हजार रुपये, निलंगा तालुक्यात ४४ हजार ७५८ शेतकऱ्यांनी ३ कोटी ५३ लाख ८९ हजार रुपये, चाकूर तालुक्यात ३७ हजार ५९ शेतकऱ्यांनी ३ कोटी १३ लाख ८५ हजार रुपये, अहमदपूर तालुक्यात २१ हजार ११८ शेतकऱ्यांनी २ कोटी ४१ लाख ५६ हजार रुपये, उदगीर तालुक्यात २५ हजार ३०३ शेतकऱ्यांनी २ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये, देवणी तालुक्यात १३ हजार ८३९ शेतकऱ्यांनी २ कोटी ७२ हजार लाख ६० हजार रुपये, जळकोट १० हजार ५६० शेतकऱ्यांनी ८० लाख ८८ हजार रुपये आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात १५ हजार ६५१ शेतकऱ्यांनी ३१ लाख ८० हजार रुपये असा एकूण २ लाख ६१ हजार १६८ शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाखांचा पीक विमा भरला आहे.