चेअरमन काकडे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक लातूरच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहे. शेतकरी ऊस उत्पादकांना अडचणीच्या काळात मदत करण्याची भूमिका पार पाडत असून लातूर जिल्हा बँकेची परिस्थिती भक्कम आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचाराने आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल सुरू असून सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. लातूर जिल्हा बँकेने ७०५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या तुलनेत जिल्हा बँक पीक कर्ज वाटपात आघाडीवर आहे.
मागील ५ वर्षांत १ हजार ५०० कोटी रुपयांची वाढ हाेऊन २ हजार ९३० कोटी रुपयांच्या ठेवी झाल्या आहे. कोरोनाच्या संकट काळात बँकेच्या वतीने लोकांना घरपोच सेवा देण्यात आली. तसेच लॉकडाऊन काळात गावोगावी बँकेच्या माध्यमातून पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, असेही चेअरमन श्रीपतराव काकडे म्हणाले. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, माजी चेअरमन एस. आर. देशमुख, संचालक संभाजीराव सुळ, ॲड. प्रमोद जाधव, सुधाकर रुकमे, स्वयंप्रभा पाटील, शिवकन्या पिंपळे, संजय बोरा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांची उपस्थिती होती.