या समितीच्या वतीने लातूरमधील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, प्रतिष्ठित नागरिक यांना गरजू कुटुंबांना धान्य कीट देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत समितीकडे जवळजवळ दीडशे कीट जमा झाले. या कीटचे वाटप जिल्हाप्रमुख व सत्र न्यायाधीश मंगला धोटे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव न्या. एस. डी. कंकणवाडी, डॉ. कल्याण बरमदे, वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, राजश्रीताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी समितीचे प्रतिनिधी राहुल लोंढे, विक्रांत शंके, अहिल्या कसपटे, राधाकृष्ण देशमुख, सतीश मिरखलकर, अमर गुंजोटे यांची उपस्थिती होती. उपक्रमासाठी लातूर वृक्ष चळवळ, नारी प्रबोधन मंच, वाचक चळवळ, ज्येष्ठ नागरिक संघ, जिल्हा विधी प्राधिकरण, रोटरी क्लब, आदींसह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.