यावेळी सिद्धी शुगरचे संचालक सूरज पाटील, श्राग्वी सूरज पाटील, शिवाअप्पा स्वामी, इलियास सय्यद, कपिल स्वामी, राहुल तेलघाने, सलीम शेख, वीरेंद्र पवार, लक्ष्मण यलमटे, अविनाश गरडे आदी उपस्थित होते. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीब, गरजू उपाशीपोटी राहू नयेत म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. वाटप केलेल्या १०१ किटमध्ये तूर डाळ, मूग डाळ, चहा पावडर, साखर, काजू, बदाम, मसाला, मीठ पुडा, मनुके, खारीक, साखर, तांदूळ, तेल आदी साहित्याचा समावेश होता. यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, कोरोनासोबतची ही लढाई सर्वांनी घरी राहूनच लढायची आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. मास्कचा वापर नियमित करा. सतत हात धुवा. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन केले.
शिरूर ताजबंद येथे गरीब, गरजूंना अन्नधान्याच्या किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST