किनगाव/ कोपरा : शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी बाबू पुंडलिक सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शेतातून कशाला जाता म्हणून आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून, शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, काठीने डोके फोडून गंभीर जखमी केले. तसेच भावासही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कैलास भिवाजी रायभोळे, राहुल भिवाजी रायभोळे, प्रशांत भिवाजी रायभोळे, नयन भिवाजी रायभोळे, अश्विन भिवाजी रायभोळे, वैभव भिवाजी रायभोळे, आकाश कैलास रायभोळे, चैतन्य कैलास रायभोळे, राजकुमार राहुल रायभोळे व बंटी प्रशांत रायभोळे (सर्व रा. खंडाळी) यांच्याविरुद्ध किनगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर, फिर्यादी प्रशांत भिवाजी रायभोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाबूराव पुंडलिक सोनकांबळे, राजरतन सोनकांबळे, शिरीषकुमार विक्रम सोनकांबळे, धम्मानंद विक्रम सोनकांबळे, प्रीतमकुमार सोनकांबळे, आशिषकुमार सोनकांबळे, विक्रम पुंडलिक सोनकांबळे, सुभाष पुंडलिक सोनकांबळे, क्षितिज पुंडलिक सोनकांबळे, प्रज्ञावंत बाबूराव सोनकांबळे (सर्व रा. खंडाळी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यातील एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोहेकॉ. चंदू गोखरे हे करीत आहेत.