वडवळ नागनाथ : दिलीपराव देशमुख यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याने चाकूर तालुक्यातील आष्टा येथे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी बैंगिरे, माजी उपसभापती वसंत डिगोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम मद्दे, मनोज बिराजदार, रणजित मिरकले, रमेश पाटील चापोलीकर, भरत गुरमे, साई हिप्पाळे, रुद्रा होळदांडगे, विकास गुरमे, माधवराव खुर्दळे, अरविंद कुलकर्णी, माजी सरपंच श्रीमंत शेळके, बालाजी गोगले, शेषेराव गायकवाड, माजी चेअरमन अण्णासाहेब गायकवाड, सूर्यकांत पाटील, वामन गायकवाड, माधवराव गायकवाड, शेषेराव निटुरे, वामन वळसंगे, दत्ता डांगे, शिवाजी गायकवाड, संजय चालवाड, गंगाधर गायकवाड, तानाजी चौधरी, राजेश्वर शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ह. भ. प. बब्रुवान खुर्दळे यांनी केले.