शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

भाव कमी असूनही शेतकऱ्यांची सोयाबीनलाच पसंती; लातूर जिल्ह्यात ११२ टक्के पेरा

By हरी मोकाशे | Updated: July 13, 2024 19:13 IST

सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात.

लातूर : गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन घटले असतानाही बाजारपेठेत दर कमीच राहिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. शिवाय, वेळेवर पाऊसही झाला. परंतु, शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच पसंती दिली असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर म्हणजे ११२ टक्के पेरा झाला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उशीरा पाऊस झाला. तद्नंतर पावसाने मोठा ताण दिला. परिणामी, उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. उत्पादन घटल्याने दरात चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, सोयाबीन काढणीपासून ते दीपावलीच्या कालावधीपर्यंत चांगला दर राहिला. त्यानंतर मात्र, सातत्याने दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. नव्या खरीप हंगामाच्या तोंडावर भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. सातत्याने ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर राहिला.

५ लाख ८८ हजार हेक्टरवर पेरणी...पीक - पेरणीसोयाबीन - ४८२५३६तूर - ७०९२६मूग - ६८४४उडीद - ५८४४कापूस - १६१८६सूर्यफुल - १८कारळ - ५५तीळ - १३८भुईमूग - १५३ज्वारी - ३६६१बाजरी - १९९मका - २२७८

तीन तालुक्यांत शंभर टक्के पेरणी...तालुका - पेरणी (टक्के)लातूर - १०९.७८औसा - १०३.२९अहमदपूर - ९४.०६निलंगा - ८९.४४शिरुर अनं. - ९४.३४उदगीर - ९४.९८चाकूर - १०२.१७रेणापूर - ९९.१२देवणी - ९४.२३जळकोट - ९९.०६एकूण - ९८.१३

आतापर्यंत सरासरी २१३ मिमी पाऊस...जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१३.८ मिमी पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात ३४३.४, औसा- ३४४.५, अहमदपूर- २८०.६, निलंगा- ३०३, उदगीर- १९७.८, चाकूर- २९४.९, रेणापूर- ३६७.४, देवणी- २१२.४, शिरुर अनंतपाळ- २२८.४, जळकोट तालुक्यात १७०.४ मिमी पाऊस झाला आहे.

सोयाबीन नगदी पीक...गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पीक पध्दतीत बदल झाला आहे. सध्या नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल आहे. दोन वर्षापासून दर कमी असले तरी आगामी काळात भाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी केली आहे.- हनुमंत शेळके, शेतकरी.

सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक...सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात. विदेशात सोयाबीन, पेंड याच्या मागणीनुसार दर मिळत असतो. त्याचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होत असतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सरासरीपेक्षा अधिक पेरा...यंदा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार १२१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने उडीद, मूग, तुरीचेही क्षेत्र वाढले आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र