याबाबत सार्वजिनक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांना देवणी ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. देवणी खु. गावालगत जाणाऱ्या देवणी-लासाेना रोडवरील मोठ्या ओढ्यावर नवीन पूल बांधण्यात यावे, सदर पुलावरून गेत पावसाळ्यात एक युवक वाहून गेल्याची घटना घडली हाेती. यापूर्वी याच गावातील दोन युवक वाहून गेल्याची घटनाही घडली हाेती. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यामुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागताे. तर अपघाताच्या घटनाही घडत आहेत. ज्या-ज्या वेळी ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने जीवतहानी हाेते, त्यावेळी शासन आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी भेट देतात. पुल बांधण्याचे आश्वासनही देले जाते, मात्र, गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. गतवर्षी गावातून जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंट रोड करण्यात आहे. मात्र, बाजूने नालीकाम करण्यात न आल्याने ओढ्यातील पाणी सरळ रस्त्यावरुन वाहते. परिणामी, सदरचे पाणी परिसरात असलेल्या घरात शिरून मोठे नुकसान होत आहे. सदरील रोडवरील फुलाचे आणि नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच यशवंत कांबळे यांनी केली आहे.
देवणी येथील पुल अन् नाली बांधकामाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST