यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. प्रशांत कापसे, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, डॉ. ओमप्रकाश कदम, वीज मंडळाचे सहाय्यक अभियंता भोसले, कार्यकारी अभियंता मठपती, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी उल्वला शिंदे, दुय्यक निबंधक गुरव, अमोल वाघमारे, कनिष्ठ अभियंता पंकज शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथ किडे, अर्जुन पाटील, प्रशांत देवशेट्टे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन यांची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, जळकोटच्या रूग्णालयात ऑक्सीजनची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांना रेफर करण्याची गरज भासणार नाही. तीन चार दिवसांत व्हेंटीलेटरही उपलब्ध होतील. याठिकाणी २५ ऑक्सिजनचे बेड, एक व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणखी गरजेनुसार खाटा वाढविण्यात येतील. नागरिकांनी मनात भिती न बाळगात लक्षणे आढळून येताच तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद धर्मांना, विठ्ठल चव्हाण, संग्राम पाटील हसुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश भाऊशेट्टी, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, दस्तगीर शेख, सरपंच शिरीष चव्हाण, श्याम डांगे, ॲड.तात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, प्रा. श्याम डावळे, पद्माकर उगिले, महेश स्वामी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.