तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेतला. त्याप्रसंगी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, दस्तगीर शेख, पाशाभाई शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भ्रमण्णा, ॲड. तात्या पाटील, गोपाळकृष्ण गबाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, प्रा. श्याम डावळे, बाबूराव जाधव, माधव दिलमिलदार, नितीन धुळशेट्टे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी उज्ज्वला शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मठपती, सहायक अभियंता भोसले, उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनेल बेन, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस.पी. गर्जे आदी उपस्थित होते.
यावेळी मारुती पांडे, महेश शेटे यांनी येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या केल्या. प्रारंभी राज्यमंत्री बनसोडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच नियोजित बुद्धविहाराच्या ठिकाणी अभिवादन केले.
सर्वांनी मनोधैर्य खचू देऊ नका...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कोविड रुग्णांबाबत आरोग्य विभागाने हलगर्जीपणा करू नये. डॉक्टरांची संख्या वाढवावी. पोलीस प्रशासनाने आवश्यक ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. आरोग्य विभागाने चाचण्या आणि लसीकरण वाढवावे. प्रसंगी वाहने भाड्याने घेऊन रुग्णांना वेळेवर घरापासून दवाखान्यांपर्यंत पाेहोचवून सेवा द्यावी. रुग्णांना दर्जेदार जेवण मिळते की नाही, याबाबत तहसीलदारांनी विशेष लक्ष द्यावे. जळकोटसाठी नवीन शंभर खाटा मंजूर करण्यात येतील. रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही. शासन-प्रशासन आपल्यासोबत आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये, तसेच आपले मनोधैर्य खचू देऊ नये. येथे आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करावेत, अशा सूचना आरोग्य उपसंचालकांना त्यांनी केल्या. येथील कोविड केअर सेंटर अपुरे पडत असल्याने मागासवर्गीय मुलींसाठी बांधण्यात आलेले शासकीय वसतिगृह ताब्यात घेण्यात यावे. तिथे विद्युत, पाण्याची चार दिवसांत सुविधा उपलब्ध करावी, असेही ते म्हणाले.