शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; मंत्र्यांचा 'छावा'ने रोखला ताफा, लातुरात आंदोलन 

By हरी मोकाशे | Updated: September 17, 2023 15:37 IST

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील डॉ. आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री संजय बनसोडे हे निघाले होते.

लातूर : पाऊस नसल्याने शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा देण्यात यावा, अशा घोषणा करीत अखिल भारतीय छावा संघटनेने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा रविवारी सकाळी ताफा रोखून घरासमोर सकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील डॉ. आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री संजय बनसोडे हे निघाले होते. तेव्हा अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना रोखत ठिय्या आंदोलन केले. यावेळी छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, भगवान माकणे, दीपक नरवडे, मनोज लंगर, मनोज फेसाटे, रमाकांत करे, बाजीराव एकुर्गे, बालाजी निकम, शिवशंकर सूर्यवंशी, पांडुरंग कोळपे, बालाजी माळी, सुदर्शन ढमाले, गोपाळ चाळक, अक्षय जावळे, किशोर पवार आदी उपस्थित होते.

सध्या मराठवाड्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. सरकारने पीकविम्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ फसव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी मराठवाड्यातील शेतकरी दैयनीय अवस्थेत जगत आहे. सिंचन, पाणी असे विविध प्रश्न आहेत. सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

शेतकरी राजास वाऱ्यावर सोडणार नाही...शनिवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळावर गंभीरपणे अर्धा ते पाऊस तास चर्चा झाली. बैठकीत काही निर्णयही झाले आहेत. शेतकऱ्यांना २५ टक्के आग्रीम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मी ही शेतकरी अन् कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुमची तळमळ मी समजून घेऊ शकतो. शेतकरी राजास वाऱ्यावर सोडणार नाही, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर