शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

By admin | Updated: February 14, 2017 21:38 IST

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या बालिका विनायक चिकटे या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात

ऑनलाइन लोकमत  लातूर, दि. 14 -  रेणापूर तालुक्यातील बावची येथील समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या बालिका विनायक चिकटे (१६, रा. हाडोळी बेलगाव ता. चाकूर) या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात विनायक चिकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. पांचाळ यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावची (ता. रेणापूर) येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने मुलींची निवासी शाळा चालविली जाते. या शाळेत १७५ मुली सध्या शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बालिका चिकटे या विद्यार्थिनीला ताप, मळमळ आणि उलट्या होत होत्या. दरम्यान, शाळेतील कर्मचाऱ्यांनी बालिका हिला रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर रविवारी पहाटे अचानक बालिकाची तब्येत बिघडली. तातडीने रेणापूर रुग्णालयात बालिका हिला दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी लातूरला हलविण्यास सांगितले. लातूर येथे बालिका चिकटेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बालिकाचे वडील विनायक देवीदास चिकटे यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. माझ्या मुलीच्या मरणास जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापिका एस.एस. पांचाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून अधीक्षक, समाजकल्याण आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.