...
अतनुरात नवयुवक ग्रामविकासचे वर्चस्व
अतनूर : जळकोट तालुक्यातील अतनूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जीव्हीसी राष्ट्रवादी नवयुवक ग्रामविकास पॅनेलचे ११ पैकी ९ उमेदवार विजयी झाले आहेत. यात लीना गव्हाणे, पूजा कोकणे, बाबू कापसे, चंद्रशेखर गव्हाणे, आरती संगेवार, संजीवनी गायकवाड, दैवशाला गव्हाणे, विठ्ठल बारसुळे, प्रभू गायकवाड हे विजयी झाले. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
...
वलांडी परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम
वलांडी : वलांडीसह परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीत प्रशासक वेदांत गोपनवाढ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. व्यंकटेश विद्यालयात संस्थाध्यक्ष व्यंकटराव पाटील, अनुसयादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थाध्यक्ष माजी आमदार धर्माजी सोनकवडे, रामचंद्र पाटील इंग्लिश स्कूलमध्ये महेश बंग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जवळगा ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी व्ही. जी. कैलवांडे, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक चव्हाण, वलांडी जिल्हा परिषोच्या शाळेत मुख्याध्यापक तानाजी पाटील, कवठाळा येथील शिवाजी विद्यालयात संस्थाध्यक्ष शिवाजी हुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
...
शिवणखेड शाळेच्या रंगरंगोटीसाठी मदत
कुमठा बु. : अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहणानंतर रंगरंगोटीसाठी प्रकाश गुरमे यांनी १० हजारांचा धनादेश मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. यावेळी उपसरपंच मंजूरखान शेख, मुख्याध्यापक मरेवाड, सरपंच बालाजी भंडारे, रवी कांबळे, आदी उपस्थित होते.
...
कुमठ्यातील शाळा, अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन
कुमठा बु. : अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. येथील ग्रामपंचायतीतर्फे १४ व्या वित्त आयोगातून दोन शाळा व पाच अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले. यावेळी सरपंच शोभाताई जाधव, चंद्रजित पाटील, अक्षय गुळवे, ग्रामविकास अधिकारी फुलमंटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक हत्ते, भोसले, कोंडिबा कांबळे, आदी उपस्थित होते.
...