शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन फोडून नुकसान ; दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी लातूर : विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरासमोर पार्किंग केलेल्या एम. एच.१२ इ.क्यू. ...

घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी

लातूर : विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरासमोर पार्किंग केलेल्या एम. एच.१२ इ.क्यू. ७२४२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अफरोज खान पठाण (रा. कमाल नगर लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून मारहाण

लातूर: तू कामासाठी घेतलेले पैसे परत दे असे फिर्यादी म्हणाली असतात तुमचे पैसे घेतलेले नाहीत असे म्हणतात डोक्याला धरून रोडवर आपटून डोके फोडले. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू माझे पैसे नाही दिले तर तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याची घटना गवळीनगर येथे घडली. याबाबत संगीता शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी उर्फ भालचंद्र त्र्यंबक कोळपे व अन्य दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुरूळे करीत आहेत.

चार्जिंगला लावलेल्या मोबाईल चोरीला

लातूर: नांदेड नाका उदगीर येथील मोरे हॉस्पिटल येथील काउंटरवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत साईनाथ नागनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. रंगवाळ करीत आहेत.

अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली दुचाकी चोरीला

लातूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेल्या एम.एच. २५ बीजे ५६७३ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत गोपाळ बद्रीनारायण अग्रोया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना‌. गिरी करीत आहेत.