शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मांजरात सध्या ४३ टक्के पाणीसाठी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच शेतीला पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: September 2, 2022 17:01 IST

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे.

लातूर : मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत ४३.०५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला असून, १५ ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच प्राप्त पाण्याचा विचार करून शेतीला पाणी सोडण्यासंदर्भातचा निर्णय होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ७६.१९० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. 

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे. शिवाय, मांजरा प्रकल्पाच्या वर अप्पर मांजरा प्रकल्प आहे. संगमेश्वर प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो. या प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. हा प्रकल्प भरल्याशिवाय मांजरा धरण भरत नाही. या धरणाच्या अलिकडे पडलेल्या ४३०.८० मि.मी. पावसाच्या पाण्यावरच २८ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात पूर्वीचे २० टक्के पाणी आहे. या पाणी संचयामुळे लातूर, एमआयडीसी, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई आदी मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पण शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आणखी धरण भरण्याची गरज आहे. 

डाव्या-उजव्या कालव्यातून शेतीला पाणी...शेतीला चार पाळ्यांसाठी एकूण ८० दलघमी पाणी लागते. पण सध्या धरणातच ७६.१९० दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतीला पाणी सोडता येणार नाही. परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. मांजरा प्रकल्पाला दोन कालवे आहेत. उजवा आणि डावा. एका कालव्यातून दहा दलघमी पाणी एका पाळीसाठी सोडले जाते. दोन्ही कालव्यातून एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी २० दलघमी लागते. अशा चार पाळ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिल्या तर ८० दलघमी पाणी लागते.

गतवर्षी ६० दलघमी पाणी दिले शेतीला...गतवर्षी ६० दलघमी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. ७५ टक्क्यांच्या वर धरण भरले होते. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होऊन ६० दलघमी पाणी शेतीला दिले असल्याची माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली. 

ऑक्टोबरमध्ये सल्लागार समितीची बैठक....मांजरा कालवा सल्लागार समितीची बैठक १५ ऑक्टोबरनंतर होईल. त्यावेळी धरणात असलेले पाणी आणि पिण्यासाठी केलेले आरक्षण विचारात घेऊन शेतीला पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय होईल. समितीमध्ये लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरagricultureशेती