लातूर : स्वत:च्या आणि रस्त्यावरील नागरिकांच्या जीवितास धोका होईल, अशा पद्धतीने वाहन चालविणाऱ्या दोघा चालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील सोमनाथ मस्के हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच २४ टी ४१७६) पिंपळफाटा रेणापूर येथे हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगात चालवून स्वत:च्या व रस्त्यावरील नागरिकांच्या जीवितास निर्माण केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोना.बालाजी डप्पडवाड यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुड येथील एका पेट्रोल पंपासमोर कार (एमएच १४ ईएच १६२९) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोना.वाल्मिक केंद्रे यांच्या फिर्यादीवरून मुरुड पोलिसात गुन्हा नोंद आहे.