रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनुप देवणीकर यांचे यश प्लाझा येथील कार्यालय तर दुसरे केंद्र रवी जोशी यांचे विद्याभारती प्रकाशन कार्यालय या दोन ठिकाणी नावनोंदणी करता येणार आहे. अनेकांना कोविड लस नावनोंदणी प्रक्रियेची माहिती नाही. या बाबींचा विचार करून सदरील मदत केंद्र चालू करण्यात आले आहेत. ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिक ज्यांना काही विशेष आजार आहे, अशा सर्वांना येथे नोंदणी करता येणार आहे. नावनोंदणी केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत चालू राहणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी लातूर जिल्हा कोविड टास्कचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम दरक, शशिकांत चलवाड, महेंद्र दुरुगकर, दुवसराव गवई, डॉ. शेंदकर, डॉ. श्रीनिवास भंडे, प्रसाद राठी, सुखानंद शेटकार, डॉ. राम कुलकर्णी, सुधीर लातुरे यांनी केले आहे.
रोटरी परिवारातर्फे कोविड लस नावनोंदणी मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:18 IST