जिल्ह्यात सध्या एकच शासकीय विलगीकरण केंद्र सुरु आहे. १२ नंबर पाटी येथे एक हजार मुलांचे शासकीय वसतीगृह असून ठिकाणी सध्या अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी विवेकानंद वस्तीगृहात असलेल्या बहूतांश विद्यार्थ्यांना गुरुवारी सुटी मिळाली. उपचाराबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले. वृद्ध, गरोदर, मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना तातडीची सेवा दिली जात असल्याचे उपचार घेऊन बरे झालेल्यांनी सांगितले. कोरोना कालावधीत आरोग्य कर्मचा-यांनी बजावलेल्या सेवेबद्दल विद्यार्थी तसेच नागरिकांच्या वतीने आरोग्य कर्मचा-यांचा गौरव करण्यात आला. यावेळी
खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे राज्यनेते सनिदेवल जाधव, पंचायत समितीचे सदस्य भैय्यासाहेब कांबळे, आर्वी ग्रामपंचायत सदस्य विलास भोसले व संभाजी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
कोविड सेंटरमधील डॉक्टरांचा सत्कार...
एमआयडीसी परिसरातील १२ नंबर पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे सनिदेवल जाधव, पं.स.सदस्य भैय्यासाहेब कांबळे, विलास भोसले, संभाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.