यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, ग्रामविकास अधिकारी टी. डी. खाडे, तलाठी शंकरराव लांडगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षक उपस्थित होते. लसीकरण माेहिमेच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. बस्तापुरे, डाॅ. वामन राठोड, आरोग्य सहाय्यक गंगाधर येवदगे, आरोग्यसेविका पुष्पा शेटे, श्रीमती बनसोडे, आशा पर्यवेक्षिका रेणुका शिदाळकर, आशा गटप्रवर्तक अनुराधा खलग्रे, आशा कार्यकर्ती यांनी अधिक परिश्रम घेतले. यावेळी डॉ. बस्तापुरे म्हणाले, कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, स्वछता बाळगावी, दर शुक्रवारी या प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरण हाेणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
वडवळ नागनाथ येथे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST