शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ !

By संदीप शिंदे | Updated: December 24, 2022 17:57 IST

Corona Vaccination: गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे.

- संदीप शिंदेलातूर -  गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना वेशीवर आला असतानाही शहरातील नागरिकांनी बुस्टर (प्रिकॉशन) डोसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाला लसीकरणासाठी विशेष शिबिरे आयोजित करावी लागत आहेत.कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी लसीकरण कवचकुंडल असल्याने लसीकरणावर भर देण्यात आला. शहरात ३ लाख ७० हजार २९० नागरिकांचे लसीकरणासाठी मनपाच्या आरोग्य विभागाला उद्दीष्ट होते. यापैकी ३ लाख ५४ हजार १६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस अद्यापर्यंत २ लाख ५४ हजार ५१६ नागरिकांनी घेतला आहे. अद्यापर्यंत १ लाख १५ हजार ७७४ नागरिकांनी दुसऱ्या डोसकडेही कानाडोळा केला आहे. तर आतापर्यंत केवळ २६ हजार ६८४ नागरिकांनीच बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी महत्वपुर्ण असलेल्या लसीकरणाकडेच शहरातील नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

कोरोनाची लागण झाली तर त्याची तीव्रता कमी रहावी, यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक आहे. कोरोनाच्या लाटेत मनपा आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवित लसीकरणावर भर दिला. मात्र, रुग्णसंख्या घटताच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. सध्या चीनसह काही देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. त्यानुसार लसीकरण पुर्ण करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्यांनी डोस घेतलेला नाही किंवा ज्यांनी दुसरा डोस घेवून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होवूनही त्यांनी बुस्टर डोस घेतलेला नाही त्यांनी लवकर लसीकरण करुन घ्यावे. तसेच ६० वर्षावरील नागरीकांनी, रक्तदाब, मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी त्यांचा प्रिकॉशन डोस प्रलंबित असल्यास त्वरीत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात १० ठिकाणी लसीकरण...लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, पटेल चौक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, इंडिया नगर, गौतम नगर (खनी भाग), प्रकाश नगर (मनपा शाळा क्रं. २४ जवळ), मंठाळे नगर (मनपा शाळा क्रं. ९ जवळ), राजीव नगर (बाभळगाव रोड ), बौद्ध नगर (यशवंत शाळा, नांदेड रोड जवळ), तावरजा कॉलनी आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र साळे गल्ली (यशवंत विद्यालय, गंजगोलाई) याठिकाणी लसीकरण सुरु राहणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसlaturलातूर