चालकांच्या आरोग्य विशेष खबरदारी...
प्रारंभी काेरोनाचा प्रादूर्भाव कमी होता. त्यामुळे परराज्यातील मजुरांना सोडविण्यासाठी अडचणी आल्या नाही. तरी खबरदारी म्हणून अनेक चालकांनी कोरोना चाचण्या केल्या. मात्र, त्यामध्ये एकही चालक, वाहक बाधित आढळले नाही. एसटी प्रवासात मास्क, फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांवर अधिक भर दिला जात आहे.
कोरोना काळात परराज्यातील मजुरांना सोडविण्यासाठी जाणा-या बसेसवरील चालकांना प्राेत्साहन भत्ता देण्याचा निर्णय ठाणे, पालघर, मुंबई या तीन जिल्ह्यांसाठी झाला होता. लातूर जिल्ह्यातील एसटी कर्मचा-यांनी याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. - लातूर परिवहन महामंडळ
लातूर विभागातील अनेक कामगारांनी जोखीत पत्कारुन कोरोना काळात सेवा बजावली आहे. अशा सर्व चालक, वाहक, वर्कशॉपमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना महामंडळाने प्राेत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे. सदरील भत्ता मिळावा, यासाठी राज्य मंडळाकडे पाठपूरावा केला जात आहे. - व्यंकटराव बिरादार, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, लातूर