कर्मचाऱ्यांना लसीकरणाची गरज...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही काेराेना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. हे कर्मचारी फ्रंट लाईनवर कार्यरत असतात. त्यांचा दैनंदिन प्रवासादरम्यान शेकडाे प्रवाशांसी थेट संपर्क येताे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना लसीकरणाची खरी गरज आहे. त्यासाठी शासनाकडूनच तातडीने लसीकरणाचा निर्णय घेण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. असे अहमदपूर येथील आगार प्रमुख शंकर सोनवणे म्हणाले.
बसस्थानकाचे दरदिन निर्जंतुकीकरण...
अहमदपूर येथील बसस्थानकावर हजारो प्रवाशांची ये-जा असल्याने काेराेनाचा प्रादुर्भाव हाेण्याची माेठी शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून महामंडळ प्रशासनाकडून दरदिन बसस्थानकाचे निर्जंतुकीकरण करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबराेबर बसेसचीही स्वच्छता केली जात आहे. बाहेर गावाहून आलेल्या बसेसही स्वच्छ करूनच आगारात घेतल्या जात आहे, असेही महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.