कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासह कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत याकरीता जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून योग्य त्या सुचना देण्यात आले आहेत. लातूर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. या कोविड सेंटरमध्ये लातूर शहरासह तालुक्यातील अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेली औषधे मात्र मुदतबाह्य देण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारी व्हिट्यामिन बी-कॉम्प्लेक्स ही गोळी मुदतबाह्य असल्याचे समोर आले आहेत. ही मुदतबाह्य गोळी रुग्णांना दिल्यामुळे त्या रुग्णांना चक्कर येणे, मळमळ होणे त्याचबरोबर अंगाला थरथरी येणे असे प्रकार होऊ लागलेले आहे. रूग्णांना मुदतबाह्य औषध देणार्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशी करून कारवाई करू...
फेब्रुवारी अखेरपर्यंतची ती गोळी आहे. २२ फेब्रुवारी रोजी रूग्णाला दिली आहे. मात्र यासंबंधी आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी सांगितले.