केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे केले आहेत. हे कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्ली येथे गत अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष संजय बिराजदार, सुधीर लखनगावे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, मधुकर धुमाळे, अब्दुल अजीज मुल्ला, अनिल देवंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदकुमार तांबोळकर, ओम जगताप यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शेतकरी विरोधी कृषी कायद्याचा निषेध करण्यात आला.
तहसील कार्यालयासमोर ठिय्या...
केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले आहेत. यासाठी गत कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजाराे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिरूर अनंतपाळ येथे काँग्रेस, राष्ट्रवादीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून तहसीलदारास निवेदनही दिले.
ठिय्या आंदोलन...
तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वतीने ठिय्या आंदोलन करून तहसीलदारास निवेदन देण्यात आले.