रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव व शहर काँग्रेसचे अध्यक्ष मतीनअली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येऊन केंद्र सरकारवर संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी ॲड. प्रमोद जाधव यांनी तहसीलदार राहुल पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात संगांयोचे अध्यक्ष गोविंद पाटील, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, सेवा दलाचे शहराध्यक्ष रमेश बोने, खैसर अली, संगांयो सदस्य ॲड. प्रशांत आकनगिरे, बाळकृष्ण माने, नगरसेवक पदम पाटील, माजी सभापती प्रदीप राठोड, माजी सरपंच विठ्ठल कटके, अशोक पाटील, अशोक राजे, नागनाथ दळवी, गुरसिध्दप्पा उटगे, भूषण पनुरे, शेख पाशामियाँ, रामलिंग जोगदंड, प्रमोद कापसे, प्रकाश सूर्यवंशी, सचिन इगे, विक्रांत पाटील, प्रेमनाथ मोटेगावकर, पंडित माने, गणेश कलाल, शंकरअप्पा येरोळे, पुंडलिक इगे, मनोहर व्यवहारे, बाबामियाँ फकीर, उमाकांत खलंग्रे, रामहरी गोरे, रोहित गिरी आदी सहभागी झाले होते.
रेणापूर तहसीलसमोर काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST