केशवराज विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
लातूर : येथील श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षिका दिवाण, डॉ. दीपक पाटील, मनोज शिरूरे, मुख्याध्यापक हेंडगे, शिक्षिका वखरे उपस्थित होत्या. गुरु-शिष्य परंपरेबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
दिगंबर माने यांची निवड
लातूर : भारतीय जनता पक्ष शहर जिल्हा उपाध्यक्षपदी दिगंबर माने यांची निवड करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, मनीष बंडेवार, शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, देविदास काळे, प्रा. प्रेरणा होनराव, अजितसिंह पाटील कव्हेकर, स्वातीताई जाधव, प्रवीण सावंत, दिग्विजय काथवटे, श्रीराम कुलकर्णी, भगवंत कुलकर्णी, सुरेश पेन्सलवार, रत्नाकर मोकाशे, प्रभाकर शिरूरे, काकासाहेब घुटे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
लाहोटी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
लातूर : शहरातील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य कर्नल एस. ए. वर्धन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रवीण शिवणगीकर, आशिष बनसोडे, मिलिंद शेटे, प्रकाश जखोटिया, विवेक डोंगरे, ज्ञानेश्वर यादव, मयूर पोतनीस, अकमल काझी, शाहू बिराजदार, जयश्री पसारे, विनोद चव्हाण उपस्थित होते. विद्यार्थ्यांना समाजात वावरण्याचे ज्ञान आणि जगण्याचा मंत्र गुरु देतात. शिष्याला ध्येयप्राप्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी शिक्षक परिश्रम घेतात, असे यावेळी सांगण्यात आले.