अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार, दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, याबाबत शहरातील व्यापाऱ्यांत संभ्रमावस्था आहे. दुपारी अधिकारी ध्वनिषेपकाद्वारे सूचना करत हाेते. दुकाने बंद करा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे सांगितले जात हाेते. परिणामी, शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. या निर्णयाविराेधात शहरातील व्यापाऱ्यांत नाराजीचा सूर आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संताप व्यक्त केला जात आहे. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. गतवर्षीपासून व्यापार बंद असल्याने दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, वीजबिल, बँकेचे हप्ते, जीएसटी भरणा, आयटी रिटर्न, कौटुंबिक खर्च भागवायचा कसा, त्यासाठी शासनाने आठवड्यातील चार दिवस व्यापार करण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निलंगा येथे व्यापाऱ्यांत संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST