शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिवसैनिकांचा सन्मान सांभाळणारे नेते; लातूर शिवसेनेतील सर्वजण त्यांच्यासोबत येतील

By हणमंत गायकवाड | Updated: August 19, 2022 17:32 IST

लातूर जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक शिंदे गटात येतील; जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव यांचा विश्वास

लातूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेते नसून कार्यकर्ते आहेत. शिवसैनिकांचा मान-सन्मान सांभाळणारे आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वच शिवसैनिक शिंदे गटात येतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. 

ॲड. बळवंत जाधव म्हणाले, लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक प्रामाणिक आहे. परंतु, मॅनेज राजकारणामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढलेली नाही. लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, औसा या मतदारसंघामध्ये शिवसेना ताकदवान आहे. आता यापुढील काळात शिवसेना शिंदे गटाकडून मॅनेज राजकारणाला थारा राहणार नाही. आमची युती भाजपासोबत असून, ही युती नैसर्गिक आहे. आम्ही लातूर ग्रामीणमधून ताकदीने लढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात शिवसेनेचे सर्वच सैनिक आमच्या गटात येतील.

राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी ज्या-ज्या वेळी एखाद्या पक्षासोबत आघाडी करतो त्यावेळी मित्र पक्ष संपतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळेच शिवसेना संपली, असा आरोपही ॲड. बळवंत जाधव यांनी केला. भाजप वगळून अन्य पक्षांसोबत जाऊन सत्ता मिळविण्याचा शिवसेनेचा विचार कधीच नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यासोबत शिवसैनिक राजकारण करूच शकत नाहीत, असेही ॲड. जाधव म्हणाले.

भाजपसोबतची युती नैसर्गिक...राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ही अनैसर्गिक युती होती. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, त्यांच्यासोबत काम कसे करायचे हा प्रश्न आमच्या मनात होता. नेमका हाच मुद्दा आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी हेरला आणि शिवसेनेला वाचविण्यासाठी आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत नैसर्गिक युती केली. त्यामुळे शिंदे गट शिवसेना आगामी काळात लातूर जिल्ह्यात ताकदीने लढेल. त्यात यश मिळवेल, असा विश्वासही ॲड. बळवंत जाधव यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेlaturलातूर