शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार स्वयंसेवकांची लातुरात स्वच्छता

By admin | Updated: March 1, 2017 17:27 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्यावतीने लातुरात बुधवारी तब्बल आठ हजार स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 01 - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्यावतीने लातुरात बुधवारी तब्बल आठ हजार स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर दुपारी २ वाजता झाला. बाहेर जिल्ह्यातील आलेल्या आठ हजार स्वयंसेवकांनी लातुरात केलेली स्वच्छता लातुरकरांसाठी प्रेरणादायी ठरली.
महाराष्ट्र भूषण डॉ.  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविले जाते. महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या प्रतिष्ठानकडून वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियान राबविले जात असून, त्यासाठी लातुरात प्रथमच तब्बल आठ हजार स्वयंसेवक हाती फावडे, टोपले आणि झाडू घेवून  बुधवारी सकाळी दाखल झाले. लातूर शहरातील सर्वच रस्ते, चौक आणि गल्लीबोळात या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. स्वयंस्फुर्तपणे या स्वच्छता अभियानात सहभागी या स्वच्छता दुतांनी सहभाग घेतला होता.
 
कचरा वाहतुकीसाठी वाहन नाही...
लातुरात स्वच्छतेसाठी आलेल्या स्वयंसेवकांच मदतीला आवश्यक असणारे कचरा वाहतूक करणारे वाहन नव्हते. त्यासाठी उपलब्ध असलेल्या वाहनातून हा कचरा उचलण्यात आला. लातूर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, रेणापूर नाका, शिवाजी चौक, बार्शी रोड, आशोक हॉटेल, गांधी चौक, गंजगोलाई, बसस्थानक परिसर, राजीव गांधी चौक परिसरात या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबविली.
 
चारशे वाहनांची पार्किंग...
प्रतिष्ठानचे तब्बल आठ हजार स्वयंसेवक जवळपास चारशे वाहनातून लातुरात बुधवारी दाखल झाले होते. स्वखर्चातून आलेल्या स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपला सहभाग घेतला होता. या वाहनांची पार्किंगची व्यवस्था ही औसा रोड परिसरात करण्यात आली होती. तेथून हे स्वयंसेवक शहराच्या वेगवेगळ््या भागात स्वच्छतेसाठी विखुरले होते.
 
ठिकठिकाणचे स्वच्छतादूत...
लातुरा स्वच्छता अभियान राबविण्यासाठी आलेल्या स्वच्छतादूतामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लातुरात प्रथमच स्वच्छतेसाठी स्वयंसेवक दाखल झाले होते.