शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात रहिवासी, उत्पन्नासाठी नागरिकांची लूट; प्रशासनाचा अंकुश नसल्याने मनमानी शुल्क

By आशपाक पठाण | Updated: March 6, 2023 19:08 IST

रहिवासी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्र ऑनलाईन काढावी लागतात.

लातूर : रहिवासी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्र ऑनलाईन काढावी लागतात. यासाठी प्रशासनाने शुल्क निश्चित करून दिले असले तरी लातूर तहसीलच्या आवारात मात्र मनमानी सुरू असून एका प्रमाणपत्रासाठी किमान २०० ते ४०० रूपये घेतले जात आहेत. या केंद्र चालकांवर नेमका अंकुश कोणाचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी रहिवासी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व आदी प्रमाणपत्र लागतात. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी महा सेवा केंद्र, सीएससी सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या केंद्रचालकांना शासनाने निश्चित करून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेता येत नाही. परंतू तहसीलच्या आवारात अनेकांची मनमानी आहे. एका प्रमाणपत्रासाठी २०० ते ४०० रूपये घेतले जातात. हे दर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा किमान सहा ते आठपट आहेत. तसेच एकाच दिवसात हवे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क घेतले जाते. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्कावर विचारणा केल्यास इथे तिथे द्यावे लागतात, असेही सांगितले जाते. विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्या चारही बाजूंनी असलेल्या काही केंद्रावर हा प्रकार सुरू असताना अधिकारी याकडे डोळेझाक करतात. केंद्र चालकांवर कुणाचेही अंकुश नाही, अधिकार्यांना हा प्रकार सांगितला की लेखी तक्रार करण्याचा सल्ला देतात. केंद्राची मंजुरी घेताना दाखविण्यात आलेले ठिकाण एक अन् कारभार सुरू असलेले ठिकाण दुसरीकडेच अशी अवस्था आहे.

तहसील कार्यालयात हवे फलक...ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्या प्रमाणपत्राला किती शुल्क लागते, कालावधी किती दिवसांचा लागतो याबाबतची माहिती दर्शविणारे फलक तहसील कार्यालयाच्या परिसरात लावावेत. जेणेकरून नागरिकांना विचारपूस करण्याची गरज भासणार नाही. सेतू सुविधा केंद्र सुरू असताना याठिकाणी सर्वप्रकारची माहिती लावली जात होती. महा ई सेवा केंद्रांनाही माहितीचे फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना आहेत, पण शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय कोण,याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी होत आहे.

निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम देऊ नका...तहसीलदार स्वप्नील पवार म्हणाले, ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. कोणत्या कामासाठी किती शुल्क लागते याचे फलक केंद्र चालकांनी दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश आहेत. तसे फलक लावण्यातही आले आहेत. निर्धारित शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेणार्यांची तक्रार केल्यावर आम्ही त्याच्यावर कारवाई करू.

 

टॅग्स :laturलातूर