अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव पाटील होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, जि. प. सदस्य रामचंद्र तिरूके, पृथ्वीराज शिवशिवे, प्रशांत पाटील, भगवानराव पाटील-तळेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी बिरादार, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड, पंचायत समितीचे सदस्य सत्यवान कांबळे, चित्रकला बिरादार, सविताताई पाटील, शीलाताई सज्जनशेट्टे व सोमनाथ बोरुळे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, हावगीराव पाटील, काशीनाथ गरिबे, अटल धनुरे, ओम धनुरे, श्रीमती लोहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यात प्राथमिक स्वरूपात ३५ दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
३१० लाभार्थ्यांना साहित्य वाटप होणार...
तालुक्यातील ३१० लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यात तीनचाकी सायकल, चार्जिंग मोटार सायकल (तीनचाकी, अंधकाठी, अंधांसाठी स्मार्टफोन, श्रवणयंत्र, कुबड्या, साधी काठी, अशा साहित्याचे वाटप त्या-त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी त्या लाभार्थ्याला शिबिरात दिलेली पावती दाखविणे बंधनकारक असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. सूत्रसंचालन राजकुमार जाधव यांनी केले. पृथ्वीराज शिवशिवे यांनी आभार मानले.