वर्षभरापासून शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतक-यांना शेतातील उत्पादित केेलेला शेतमाल मिळेल त्या दराने विक्री करावा लागला. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व खताची दर वाढ करून शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ रद्द करावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, कल्याण पाटील, सिद्धेश्वर पाटील, मंजूरखान पठाण, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, विजयकुमार चवळे, अहमद सरवर, प्रा. शिवाजीराव देवनाळे, संतोष बिराजदार, बाळासाहेब मरलापल्ले, फैजूखान पठाण, प्रा. धनाजी जाधव, सुभाष धनुरे, अनिल मुदाळे, संतोष वळसणे, पंडित नाना ढगे, शशिकांत बनसोडे, संजय काळे, संजय पाटील, श्रीनिवास एकुर्केकर, आदर्श पिंपरे, अमोल घुमाडे, कपिल शेटकार, माधव कांबळे, विकी वाघमारे, सद्दाम बागवान, ज्ञानेश्वर आपटे, ज्ञानेश्वर बिरादार, अविनाश गायकवाड यांच्या सह्या आहेत.