७ व्या वेतन आयोगाचे एरियस अजूनही डीसीपीएस खात्यावर नाही अथवा रोखही दिलेले नाही. मागील २ वर्षात यावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ती पूर्ण करावी. डीसीपीएसमध्ये कपात झालेल्या रकमेचा हिशोब न जुळवता व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा या अगोदरच्या जिल्हा परिषदेतील हिशोब लातूर जिल्हा परिषदेस वर्गीकृत करुनच एनपीएस खाते काढावेत. ऑनलाईन हिशोबात असलेल्या असंख्य त्रुटी दूर करुनच मग एनपीएस खाते उघडावीत. ७ व्या वेतन आयोगाचे एरियस डीसीपीएस खात्यावर घेणे, अगोदरच्या जिल्हा परिषदेतील डीसीपीएस रक्कम ट्रान्सफर करणे, ऑनलाईन हिशोबातील त्रुटी दूर करणे, या सर्व बाबी करुन नंतर योग्य व अचूक लेखी हिशोब प्रत्येक डीसीपीएस धारकाला मिळत नाही, तोपर्यंत एनपीएस खाते उघडण्यावर बहिष्कार कायम असेल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, नागनाथ सुरवसे यांच्यासह स्वाती कांबळे, विवेक पाटील, व्यंकट पडलवार, पिराजी पिटले, लक्ष्मण बोईनवाड, सचिन आहेरकर, कचरु धोत्रे, श्रीनिवास पडलवार, सिराज तांबोळी, महेश क्षीरसागर, सूर्यकांत बाचावार, सतीश काटेवाड, गोविंद धुमाळ आदी उपस्थित होते.