लातूर शहरात दुचाकीचे सत्र सुरुच
लातूर : शहरातील एका कॉम्प्लेक्सच्या बाहेर पार्किंग केलेली एम.एच. २४. वाय २१४४ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी विष्णु सदाशिव बडूरे यांच्या तक्रारीवुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बिरादार करीत आहेत. दरम्यान सदरील दुचाकी २ जुन २०२० या दिवशी चोरीला गेली असून, दुचाकी मिळून न आल्याने २८ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोशी महाविद्यालयात काव्यसंध्या कार्यक्रम
लातूर : शहरातील गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत काव्यसंध्या या कार्यक्रमात प्रा.डॉ. प्रतिभा जाध यांनी कविता व एकपात्री सादरीकरण व कवितांचे ही गायन केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, प्रा. नयन भादुले, डॉ. सचिन प्रयाग, प्रा. कल्पना झांबरे, प्रा. रेशमा खंडेलवाल, ग्रंथपाल मनिषा लातूरकर, टीना बोरा, विजय पारीख, संवेद सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
दयानंद महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजनलातूर: दयानंद वाणिज्य महाविद्यालयात भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उपक्रमात डॉ. शंकरानंद येडले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ.श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, डॉ. गणेश लहाने, प्रा.डॉ. साईनाथ उमाटे, डॉ. नितेश स्वामी, डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रा.विठ्ठल जाधव आदींसह प्राध्यापक, कर्मचा-यांची उपस्थिती होती.
बिदर रोड परिसरात दुचाकीची चोरी
लातूर : उदगीर शहरातील बिदर रोड परिसरात पार्कींग केलेली एमएच २४. एक्यु २८८० क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी नागनाथ शिवाजी गायकवाड यांच्या तक्रारीवरुन उदगीर ग्रामीण पोलीसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना रंगवाळ करीत आहे. दरम्यान, उदगीर शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वैभव वाघमारे यांचा दयानंद कलामध्ये सत्कार
लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्टल परीक्षेत वैभव वाघमारे यांनी यश मिळविले आहे. त्यांनी दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेतला असून, त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य प्रा. अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, विकास वाघमारे आदींसह प्राध्यापक, कर्मचा-यांची उपस्थिती होती.
वसंत बंडे यांना पीएच.डी.प्रदान
लातूर : येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.वसंत बंडे यांना स्वारातीम विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. त्यांना डाॅ.अनिल कठारे यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल प्राचार्य डॉ. राम बोरगांवकर, सुरमणी पं.बाबुराव बोरगांवकर, मंगेश बोरगांवकर, गणेश बोरगांवकर, तुकाराम पाटील, शशिकांत सोळुंके, प्रा.डाॅ.सुदाम पवार, प्रा.डाॅ.संतोष कुलकर्णी, प्रा.पांडुरंग गोरे, प्रा.अमोल जाधव, प्रा.मोनालिसा खानोरकर, प्रा.ज्योती मामडगे, प्रा.डाॅ.सुरेश जोंधळे, प्रा.डाॅ.विनोद जाधव, प्रा.डाॅ.राम खलंग्रे,श्री.विठ्ठल चव्हाण आदींनी कौतूक केले आहे.
राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात कार्यक्रम
लातूर : येथील राजमाता जिजामाता जिजामाता संकूलात शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच १२० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संकूलाच्या वतीने स्वीकारण्यात आली. यावेळी प्राचार्य डी.एन. केंद्रे, संगमेश्वर केंद्रे, रमेश बिरादार, अशोक पवार, मदन धुमाळ, शोभा कांबळे, सुनीता जवळे, अनुराधा पाटील, संजय गुरमे, अशोक मुंढे, महेश मोटाडे, पांडुरंग कुलकर्णी, सत्यवान देशपांडे, सुधाकर लोहकरे, विवेकानंद लोहकरे आदींची उपस्थिती होती.
एकता ऑटो रिक्षा युनियनचे रक्तदान शिबीर
लातूर : येथील एकता आटोरिक्षा युनियनच्या वतीने गंजगोलाई येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी माउली ब्लड बँकेच्या वतीने संकलन करण्यात आले. कार्यक्रमास खा. सुधाकर श्रृंगारे, दिलीप सोनकांबळे, प्रतिक कांबळे, युनियनचे अध्यक्ष दिनेश कांबळे, रामदास सोनवणे, शहाजीराजे गिरी, विकास ढवारे, संदिप गायकवाड, सुनील समुकराव, शिवाजी गंगणे, ज्ञानेश्वर अलमले, नरसिंग काळे, सुलेमान शेख, बडेसाब शेख आदींसह पदाधिका-यांची उपस्थिती होती.
त्रिवेणी देशमुख विद्यालयात उपक्रम
लातूर : औसा तालुक्यातील तळणी येथील त्रिवेणी देशमुख माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, विश्वास देशमुख, प्रदीप शिंदे, भागवत नाईकवाडे, बळवंत साळूंके, राजेंद्र माने, दिगंबर पेंढारकर, कृष्णाजी औंढेकर, अजित देशमुख, जयप्रकाश पवार, बालाजी भारती आदींसह शिक्षक, कर्मचा-यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटामूळे नियमांचे पालन करीत शाळा सुरु झाल्या असल्या तरी मास्क, फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.