शिरूर अनंतपाळ येथे अ दर्जाचे दुमजली सर्व सोयी-सुविधा असलेले वाचनालय आहे; मात्र संवाद क्रांती झाल्याने सर्वत्र मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातून वाचनसंस्कृती हरवत चालली आहे. वाचक वर्ग दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्यावतीने बुधवारी वाचनालयास ग्रंथांची भेट दिली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एल.बी. आवाळे, ग्रंथपाल काशिनाथ बोडके, सहायक ग्रंथपाल शिवनंदा चौंसष्टे, अनंत सूर्यवंशी, सुदर्शन गायकवाड, अनिल देवंगरे, सोमनाथ तोंडारे, भरत शिंदे, ऋत्विक सांगवे, माधव आवाळे यांची उपस्थिती होती.
स्पर्धा परीक्षा उपयुक्त ग्रंथाचा समावेश...
वाचकांना विविध प्रकाशनाच्या दर्जेदार ग्रंथाचे वाचन करता यावे म्हणून सुरज चव्हाण यांनी विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा २०० ग्रंथांचा अनमोल ठेवा भेट दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना ग्रंथ खजिना उपलब्ध झाला असल्यामुळे सुरज चव्हाण यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वाचनालयाकडून चव्हाण यांचा सत्कार...
सुरज चव्हाण यांनी वाचनालयास अनमोल ग्रंथ भेट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक तर होत आहेच; परंतु वाचनालयाच्यावतीने अध्यक्ष एल. बी. आवाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
फाेटाे ओळी :
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी...
शिरूर अनंतपाळ येथील अनंतपाळ नवयुवक वाचनालयास ग्रंथ भेट देताना राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण.