सिध्दी शुगर कारखान्याने चालू गळीत हंगामातील ऊसाच्या एफआरपी फरकाची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, सभापती रोहिदास वाघमारे, त्र्यंबकराव गुट्टे, ॲड. आर.डी. शेळके, हरीभाऊ येरमे, कमलाकर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हणमंत देवकत्ते, शिवाजी बैनगिरे, अमित रेड्डी, राम बेल्लाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले, मांजरा परिवाराच्या वतीने भाव देऊ असे सांगितले होते. याबाबत गेल्या पाच वर्षांत शासनाने घालून दिलेला मापदंड पाळला जात नाही. इतर कारखान्याच्या स्पर्धेत भाव द्यावा. भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटभरू धोरणामुळे सहकारी साखर कारखाने बंद पडले व बंद पडलेले कारखाने अतिशय कमी किंमतीत विकत घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपी १५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. तरी ती वेळेवर दिली जात नाही. यावेळी किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, सभापती रोहिदास वाघमारे, त्र्यंबक गुट्टे आदींनी मनोगत व्यक्त केली. सुत्रसंचलन व आभार गोविंद गिरी यांनी केले.