लाॅकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद होते. अशा परिस्थितीत महावितरणने वापरापेक्षा अधिक वीजबिले दिली आहेत. आता बिलांची सक्तीने वसुली सुरू केली आहे. शेतकऱ्यांना एक- एक महिना डीपी दुरुस्त करून मिळत नाही. त्यात सुधारणा करावी. ३०-४० वर्षांपूर्वींच्या विद्युत तारा बदलाव्यात तसेच वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आ. अभिमन्यू पवार, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहु कांबळे, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, सुशील वाजपेयी, गटनेते सुनील उटगे, संतोषअप्पा मुक्ता, प्रा. राचट्टे, व्यंकट नाना मोरे, नागनाथ गंदुरे, दीपक चाबुकस्वार, काकासाहेब मोरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष धनराज परशने, राजकिरण साठे, विकास नरहरे, प्रा. शिवरुद्र मुर्गे, संजय कुलकर्णी, जयपाल भोसले, दौलत वाघमारे, सिद्धांत बेडेकर, कल्पना डांगे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रंधवे, सुनिता सूर्यवंशी, ज्योती हलकुडे, गोपाळ शिंदे, विजय भुजबळ, चंद्रकांत साळुंखे, धनराज काजळे, प्रशांत काकडे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.