शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रेवाडी, सुकणी येथील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच; ८ हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 19:44 IST

Bird flu : अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका पोल्ट्रीफार्ममधील ३५० पक्षी दगावले. त्यानंतर सुकणी येथील एका धाब्यावर ८० पक्षांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपोल्ट्री परिसरातील दहा किमी अंतर प्रभावक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. १ किमी परिघातील पक्षी नष्ट करणार... 

लातूर : जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील ३५० आणि सुकणी येथील ८० कोंबड्या अचानक दगावल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे प्रत्येकी पाच नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. यात पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुकणी येथील १६ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर केंद्रेवाडी येथील ८ हजार पक्षी नष्ट करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका पोल्ट्रीफार्ममधील ३५० पक्षी दगावले. त्यानंतर सुकणी येथील एका धाब्यावर ८० पक्षांचा मृत्यू झाला. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत दोन दिवसांपुर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तत्पुर्वी पोल्ट्री परिसरातील दहा किमी अंतर प्रभावक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, आता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या पोल्ट्रीमधील पक्षी नष्ट करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडिले यांनी सांगितले. 

१ किमी परिघातील पक्षी नष्ट करणार... केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार ज्या ठिकाणी पक्षी दगावले आहेत आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याठिकाणच्या एक किमी परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. केंद्रेवाडी येथील पोल्ट्रीमध्ये ८ हजार पक्षी आहेत. ते नष्ट केल्यानंतर एक किमी परिघातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

उत्पादकास मिळणार आर्थिक मदत... सहा आठवड्याच्या आतील एका पक्षाला २० रुपये तर सहा आठवड्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक पक्षास ७० रुपये अशी मदत कुकुटपालन व्यावसायिकास दिली जाणार आहे. केंद्रेवाडी येथील बहूतांश पक्षी सहा आठवड्याच्या आतील आहेत. तर सुकणी येथील नष्ट करण्यात आलेले १६ पक्षी सहा आठवडयापेक्षा अधिक वयाचे होते, असेही पशुसंवर्धन अधिकारी पडीले यांनी सांगितले.

वंजारवाडी अहवालाची प्रतीक्षा...उदगीर तालुक्यातील वंजारवाडी येथील ५५ पक्षी दगावले आहेत.या मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्याचा अहवाल बुधवारपर्यंत प्राप्त होईल.

टॅग्स :laturलातूरBird Fluबर्ड फ्लू