फिर्यादी सुलोचना ज्ञानोबा कदम या शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घरासमोर थांबल्या असत्या, सरपंच गंगाधर देपे, बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहुल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, शांताबाई आचार्य यांच्यासह १७ जणांनी एकत्रित येऊन सार्वजनिक कामासाठी सफाई करत असताना मंडळी जमवून फिर्यादीस बेदम मारहाण केली तसेच शूटिंग करताना मोबाईल पळवून अवघड जागेवर दगड मारून जखमी केले तसेच विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून उपरोक्त १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कामात अडथळा...
दरम्यान, कोपरा येथे सार्वजनिक ठिकाणी सभागृहाचे कामकाज करण्यासाठी साफसफाई करत असताना फिर्यादी हा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत सफाई करून घेत असताना सुलोचना ज्ञानोबा कदम व मंगल ज्ञानोबा कदम यांनी कामात अडळळा निर्माण करून दगड फेकून मारले. शिवीगाळ करून जेसीबीचे नुकसान केले. याबाबत ग्रामसेवक रविंद्र क्षीरसागर यांनी भादा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुलोचना ज्ञानोबा कदम व मंगल ज्ञानोबा कदम (रा. दोघेही कोपरा)दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी बी. एस. लांजिले हे करत आहेत.