अहमदपूर तालुक्यातील सांगवी बु शिवारात फिर्यादी बालाजी गंगाधर हामणे यांना संगनमत करून शेतीच्या कारणावरून तू काय शहाणा झाला आहेस का असे म्हणून दगडाने तसेच फिर्यादीच्या पत्नीस डोक्यात मारून जखमी केले आणि एकाने हातातील काठीने फिर्यादीच्या मुलास मारून जखमी करून मुक्कामार दिला. तसेच फिर्यादीलाही काठीने डोक्यात मारून मुकामार दिला. जीवे मारण्याची धमकी दिली, असे बालाजी हामणे यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अनिल अशोक हामणे व अन्य तिघा जणांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात कलम ३२४,३२४,५०४,५०६,३४ / भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोना. बडे करीत आहेत.
अशोक हॉटेल येथून दुचाकीची चोरी
लातूर : शहरातील अशोक हॉटेल परिसरात पार्किंग केलेल्या एम एच ०४ ओ एक्स ७५ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत इरफान इसाक सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ बताने करीत आहेत.
ट्रकच्या अपघातात एकदम जखमी
लातूर: भरधाव वेगातील एम. एच.१३ सी यु १९३३ या क्रमांकाच्या ट्रकने पाठीमागून फिर्यादीच्या वाहनाला धडक दिली या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाला. याबाबत किरण प्रल्हाद गवळी राहणार तुळजाभवानी नगर लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.एच. १३ सी यु १९३३ या क्रमांकाच्या ट्रक चालकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेतातील बांधावरून जाण्यावरून मारहाण
लातूर: तू नेहमी आमच्या शेतातील बांधावरून का जातो असे म्हणून एकाला भुतमुंगळी शिवारात जबर मारहाण झाली. याबाबत श्रीमंत नारायण माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय वामन माने व अन्य दोघा विरुद्ध कासार शिरसी पोलिसात करण्यात आला असून पुढील तपास पुन्हा जाधव करीत आहेत.
तू येथे पेरणी करायची नाही म्हणून मारहाण
लातूर : तू येथे पेरणी करायची नाही इथून ट्रॅक्टर बाहेर काढ असे म्हणून फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीला मारहाण झाल्याची घटना लातूर तालुक्यातील काडगाव शिवारात घडली. याबाबत मिठाराम रूपचंद राठोड (रूपचंद नगर रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर सखाराम राठोड व अन्य दोघांविरुद्ध गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनी. कांबळे करीत आहेत.